
जुने नाशिक/ प्रतिनिधी
जुने नाशिकच्या चौक मंडई भागात असलेल्या जहांगीर मशीद शॉपिंग सेंटर मधील तीन गाळ्यांना भीषण आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे.
स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले असून घटनास्थळी नुकतेच अग्निशामक दलाचे बंब देखील दाखल झाले आहेत.
दुकाने बंद असल्यामुळे जीवित हानी झाली नाही. ही घटना पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली . आगीचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हे तिन्ही दुकाने धार्मिक साहित्य विक्रीसह जनरल साधने विक्रीची असल्याचे समजते.