नाशकात पोहोण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली

नाशकात पोहोण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली

नाशिक | प्रतिनिधी

मखमलाबाद जवळ (Makhmalabad road) असलेल्या पाटात पोहोण्यासाठी गेलेल्या तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. निलेश मुळे (वय १४), प्रमोद जाधव (वय १३) व सिद्धू धोत्रे (वय १५) अशी तिघांची नावे आहेत. सर्वजन गजवक्र नगर (Ganvakra nagar area) भागात असलेल्या नामको कॅन्सर हॉस्पिटल (Namaco Cancer Hospital) मागे राहत असल्याची माहिती मिळते आहे. (three boys dies due to drowning at makhmkalabad road canal)

नाशकात पोहोण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली
VIDEO : खैरी निमगांव येथे गारांचा पाऊस

पाटाला पाणी सोडलेले असल्याने दुपारी 2 वाजेच्या 5 मित्र पोहोण्यासाठी आले होते. त्यापैकी तीन मित्र पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. इतर दोघा मित्रांनी आरडाओरड केली असता आजूबाजूचे काहीजन मदतीसाठी आली. याच वेळी जीवरक्षक दलाला पाचारण करण्यात आले.

नाशकात पोहोण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली
‘ते’ हल्लेखोर शिवसेनेचेच; रोहिणी खडसेंचा दावा

जीवरक्षक दलाच्या जवानांनी तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com