Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये ३ रुपयांचा मास्क मिळतोय १६ रुपयांना

नाशिकमध्ये ३ रुपयांचा मास्क मिळतोय १६ रुपयांना

नाशिक । प्रतिनिधी

राज्य शासनाने करोनाच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी हॉस्पीटल, औषधांसह मास्कचे दरही ठरवून दिलेले आहेत. मात्र , असे असताना नाशिकमध्ये तीन रुपयांचा मास्क तब्बल 16 रुपयांना विकला जात आहेत…

- Advertisement -

अशी तक्रार नाशिक जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष संभाजी पवार यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. शहरातील मेडीकलकडून ही आर्थिक लूट होत असल्याचे पुरावे त्यांनी प्रशासनाला दिले केले आहेत.

करोना रुग्णांवर उपचार करणार्‍या खासगी रुग्णालयांकडून ग्राहकांची लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ऑडिटर नेमला आहे. ग्राहकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे.

मात्र, आता फक्त रुग्णालयांवरच नाहीतर मेडीकलवर देखील नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण शहरातील सनराईस मेडीकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सने तीन रुपयांचा मास्क तब्बल 16 रुपयांना विकल्याप्रकरणी संभाजी पवार यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.

अशा पध्दतीने सर्वसामान्य नागरीकांची फसवणूक होत असल्याचे त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त माधुरी पवार यांना सांगितले. शासनाने मूळात मास्कचे दर ठरवून दिलेले असताना अशा पध्दतीने लूटमार करणार्‍या व्यक्तिंवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, मास्कचे विविध प्रकार सध्या बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्यांचे दरही भिन्न आहेत. ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ हा मास्क अगदी कमी किमतीत मिळतो. होलसेलमध्ये त्याची किंमत 3 ते 5 रुपये असताना किरकोळ विक्री करताना मेडीकल चालक तब्बल 16 रुपये घेतात. तसेच हात विक्री करणार्‍या व्यक्ती बिलही देत नसल्याचे दिसून येते.

संभाजी पवार यांनी खरेदी केलेल्या मास्कचे बील व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्राप्त झाले आहे. त्याची शहानिशा करुन योग्य ती कारवाई केली जाईल.

डी. आय. मोरे, अधिकारी, अन्न व औषध प्रशासन

- Advertisment -

ताज्या बातम्या