कातरवाडी खून प्रकरण : पत्नीसह दोघांना बेड्या

कातरवाडी खून प्रकरण : पत्नीसह दोघांना बेड्या

चांदवड | Chandwad

कातरवाडी येथे दोन दिवसापूर्वी सोपान बाबुराव झाल्टे यांचा राहत्या घरी अज्ञात लोकांनी हल्ला करून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, सोपान बाबुराव झाल्टे यांचा राहत्या घरी अज्ञात लोकांनी हल्ला करून खून केला होता. या घटनेची माहिती मिळताच मनमाड अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंग साळवे व चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारवकर,पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, कर्मचारी मंगेश डोंगरे, उत्तम गोसावी, अमोल जाधव, विजय जाधव, कीर्ती संसारे, पालवे, गुळे, राजेंद्र बिन्नर आदी कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखा नासिक यांच्या मदतीने व मालेगाव ग्रामीण पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व नाशिक ग्रामीण सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात आला.

कातरवाडी खून प्रकरण : पत्नीसह दोघांना बेड्या
सुरगाणा : नाशिकचे 'काश्मीर', पाहा फोटो...

तपासाअंती झाल्टे यांच्या पत्नी मनीषा सोपान झाल्टे, तिचे सहकारी सुभाष संसारे (रा. कातरवाडी) व खलील शहा (रा. मनमाड) या तीन संशयितांना चांदवड पोलिसांनी अटक केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com