Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याBreaking News : संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक; सभागृहात तीन जण घुसले

Breaking News : संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक; सभागृहात तीन जण घुसले

नवी दिल्ली | New Delhi

येथे संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून अधिवेशनादरम्यान लोकसभा सभागृहात (Lok Sabha Hall) कामकाजावेळी अज्ञात तीन जण घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला असून यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे…

- Advertisement -

मोठी बातमी! युवा संघर्ष यात्रा विधानभवनाकडे जाताना अडवली; रोहित पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा सभागृहात प्रेक्षक गॅलरीत (Audience Gallery) बसलेल्या एका व्यक्तीने खाली उडी मारली. त्यामुळे भर लोकसभेत काहीसा गोंधळ उडाला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. या तिघांकडे स्प्रे असल्याची माहिती समोर आली असून स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळल्या आहेत. हे तिघांनाही म्हैसूर येथील खासदार प्रताप सिंह यांच्यामार्फेत पास मिळाले असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर या प्रकारामुळे पुन्हा एकदा लोकसभेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद – शरद पवार

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये महाराष्ट्रातील लातूर येथील अमोल शिंदे नावाच्या व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर सागर शर्मा असे लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच लोकसभेबाहेर गोंधळ घालणाऱ्या महिलेचे नाव नीलम कौर सिंह (वय ४२) असे असून ही महिला हरियाणातील हिस्सार भागातील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नेमकं काय घडलं ?

लोकसभेत शून्य प्रहाराचे कामकाज सुरु होते. यावेळी तीन अज्ञात व्यक्ती प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यानंतर हे तिघेही प्रेक्षक गॅलरीतून खांबाला धरुन लटकले. त्यातील दोन जण खाली उडी मारून सभागृहात पळत होते. यावेळी यामधील एकाने बुटातून गॅसचा फवारा काढत सभागृहात मारला. त्यामुळे उपस्थित खासदारांच्या नाकात जळजळ सुरु झाली. तसेच त्यांनी पिवळ्या रंगाचा गॅसही फोडला. त्यामुळे संसद भवन परिसर पिवळा झाला होता. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी या तिघांनाही ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या