Accident News : समृद्धी महामार्गावर अपघात; कारचा चक्काचूर, तीन जखमी

 Accident News : समृद्धी महामार्गावर अपघात; कारचा चक्काचूर, तीन जखमी

वाशिम | Washim

समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) लोकार्पण झाल्यापासून त्यावर दिवसाआड अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. महामार्गावर होणाऱ्या या अपघातात (Accident) अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. अशातच आता पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यातील (Washim District) कारंजा तालुक्यातून (Karanja Taluka) गेलेल्या समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १६९ हद्दीत अपघात घडला आहे...

 Accident News : समृद्धी महामार्गावर अपघात; कारचा चक्काचूर, तीन जखमी
'... देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है'; भाजपने शिवसेनेला डिवचलं

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून नागपूरहून-कोल्‍हापूरकडे (Nagpur to Kolhapur) जात असताना कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारमधील प्रमिला विश्वकर्मा (वय ३७), उमाशंकर विश्वकर्मा (वय ४५) व सत्यम विश्वकर्मा (वय २२) सर्व रा. कोल्हापूर हे तीन जण जखमी (Injured) झाले आहेत. तर कारचा वेग अधिक असल्‍याने या अपघातात कार तीन ते चार पलट्या खाऊन रोडच्या दुसऱ्या बाजूला गेली. त्यामुळे कारचा अक्षरक्षा चक्काचुर झाला आहे.

 Accident News : समृद्धी महामार्गावर अपघात; कारचा चक्काचूर, तीन जखमी
ब्रिजभूषण सिंह यांना 'त्या' प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दिली क्लीन चिट

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळतात तात्काळ लोकेशन समृद्धी हायवे १०८ पायलट आशिष चव्हाण, डॉ.गणेश यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात (Karanja Vice Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

 Accident News : समृद्धी महामार्गावर अपघात; कारचा चक्काचूर, तीन जखमी
Video : कागदावर कुंकवाच्या पाऊलखुणा; चिमुकल्यांचं शाळेत अनोखं स्वागत
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com