Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघाताच्या घटना घडत असून त्यात अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे.अशातच आता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) कार आणि ट्रकचा भीषण अपघात (Car and Truck Accident) झाल्याची घटना घडली असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत...

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
Maharashtra Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार; 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसणार

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून गुजरातच्या (Mumbai to Gujarat) दिशेने एक कार येत असतांना वसई सतीवली बजरंग हॉटेलसमोर हा अपघात झाला. यावेळी कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवर (Truck) धडकली. ही धडक इतकी भीषण होती की यात कार चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
Nashik Accident News : एसटी बसचा अपघात; शाळकरी मुलांसह प्रवासी जखमी

दरम्यान, यानंतर घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी (Vasai Police) घटनास्थळी दाखल होत जखमींना (injured) उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल केले. तसेच ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
Asia Cup 2023 मध्ये आजपासून Super 4 चा थरार, 'या' चार संघांमध्ये रंगणार 6 सामने!
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com