Tuesday, May 14, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकरी आंदोलनाला मोठं यश! तीनही कृषी कायदे रद्द होणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

शेतकरी आंदोलनाला मोठं यश! तीनही कृषी कायदे रद्द होणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

दिल्ली l Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे (New farm law) मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. सकाळी ९.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात झाली. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या फायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवले.

PayTM : पेटीएमचा शेअर का गडगडला?, जाणून घ्या काय म्हणताय तज्ज्ञ

सोबतच, हे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. या तपस्येत कमी राहिली असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केलीय. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय.

…तोपर्यंत घरी जाणार नाही; पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आंदोलक शेतकरी ठाम

पुढे बोलतांना ते म्हणाले, ‘आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पणाने शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणला आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पणाने शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणले.’

- Advertisment -

ताज्या बातम्या