नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; तिघांची 'आयर्नमॅन २' ला गवसणी

महिेंद्र छोरीया, प्रशांत डबरी व सुभाष पाटील यांची उत्तूंग झेप
नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; तिघांची 'आयर्नमॅन २' ला गवसणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दक्षिण आफ्रिका (South Africa) हा सर्वात कठीण परिस्थिती असलेला सर्वात कठीण आर्यनमॅन-2 (Iron man 2) चे आव्हान यशस्वी पेलत नाशिकच्या महिेंद्र छोरीया, (Mahendra Chhoria) प्रशांत डबरी (Prashant Dabari) व सुभाष पाटील (Subhash Patil) या तिघांनी या स्पर्धेवर नाव कोरले. विशेष म्हणजे चिकुन गुनियाचा त्रास वाढलेला असतानाही या स्पर्धेत मोहोर उमटवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे...

आफ्रिकन चॅम्पियनशिप (African Championship 2021) या हॅम्बर्गमध्ये झालेल्या आर्यनमॅन -2 ला चिकनगुनियामुळे मुकावे लागले होते.

या स्पर्धेत 50-60 किमी प्रति तास वेगाने पूर्वेकडे वाहणारे वारे, पोहण्यासाठी हिंद महासागरात प्रवेश करणे, 8 ते 10 फूटांच्या लाटा अश्या वातावरणात पाण्यात उतरणे खूपच भितीदायक होते.

मात्र प्रबळ इच्छाशक्ती व खंबीर पाठबलाच्या बळावर आम्ही ते पार केले. त्यानंतर आव्हान होते ते सायकलींगचे.

50 ते 60 कि.मी प्रती तासाच्या वेगाने वाहणारे वारेउंच सखल भागातून करावी लागणारी सायकलींग 1035 मीटर उंची वर जाणे हे एक अवघड टास्क होते.

एकदा मनात विचार आला देखील की आपण इथे का आहोत? मी या कार्यक्रमासाठी नोंदणी का केली? मात्र, या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर समोर येत होते. मला आर्यनमॅन -2 पूर्ण करायचे आहे. त्यामुळे पून्हा नव्या जोमाने चढाईला सूरूवात करीत होतो. त्यामुळे बळ व हुरुप वाढत होता.शर्यत न सोडण्याचा आणि माझे सर्वोत्तम देण्याचा निर्णय मनाशी घेतला. आणि हे आव्हानही सहज पेलले अशी माहिती महेंद्र छोरीया यांनी देशदूतला दिली.

या स्पर्धेत शेवटचा टप्पा म्हणजे 42.2 किमी धावणे होता. दोन टास्क पूर्ण केल्यानंतर शरीर थकले होते. पाय उचलेले जात नव्हते. पण मग मानसिक ताकद पून्हा एकदा उर्मी भरत धावणे सुरु ठेवले.

आर्यनमॅन-2 (ironman 2) हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची क्षमता तपासणारी स्पर्धा आहे. आर्यनमॅन-2 हे टायटल साध्य करताना योग्य प्रशिक्षकाची गरज आहे. त्याच्या प्रशिक्षणाशिवाय केवळ अशक्य होते. अनेक मित्रांचा पाठिंबा आणि प्रेरणा मिळत होती. पत्नी कीर्ती ही मुख्य समर्थन प्रणाली होती. माझ्या नकारात्मक विचारांना सकारात्मक करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

माझ्या मुली आणि माझे संपूर्ण कुटुंबासोबतच प्रायोजक पंकजला त्याला प्रायोजकत्वाचे महत्व पटवून देण्यात मी यशस्वी झालो. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेत ट्रायथलॉन-2 पूर्ण करताना मी 14 तास 33 मिनिटांची वेळ दिली.

प्रशांत डबरी यांनी 14 तास 57 मिनिटांची वेळ दिली तर सुभाष पवार यांनी 15 तास 11 मिनिटांची वेळ दिली.

ट्रायथलॉन-2 (Triathlon 2) चा प्रवास पुर्ण करताना खर्‍या अर्थाने आपण नाशिक शहरासोबतच देशाचे नाव मोठे करण्यात यशस्वी झाल्याचे समाधान वाटत असल्याचे महेंद्र छोरीया (Mahendra Chhoria) यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com