नाशिक हादरलं! आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची हत्या

नाशिक हादरलं! आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची हत्या

नाशिक | Nashik

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना (Incidents of crime) वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच आता शहरामधील गंगापूर रोड परिसरातील (Gangapur Road Area) ध्रुवनगरमध्ये आईला बेशुद्ध करून एका अज्ञात महिलेने तीन वर्षीय चिमुकलीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, धृवांशी भुषण रोकडे (वय ३ महिने) असे हत्या केलेल्या चिमुकलीचे नाव आहे. गंगापूर-सातपूर लिंकरोड येथील ध्रुवनगर परिसरात (Dhruvnagar Area) भुषण रोकडे हे आपली पत्नी, आई आणि तीन महिन्यांची चिमुकली धृवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर (Satpur) येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. काल (सोमवारी) ते नेहमीप्रमाणे कामाला गेल्यानंतर घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या.

नाशिक हादरलं! आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची हत्या
दोन कंटेनरच्या धडकेत सिक्युरिटी प्रेस रुग्णालयाची भिंत उद्ध्वस्त

त्यानंतर सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. या गोष्टीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात घुसली. त्यावेळी या अज्ञात महिलेने धृवांशीच्या आईच्या नाकाला रूमाल लावल्याने ती महिला बेशुद्ध झाली.

यानंतर एका अज्ञात महिलेने तीन महिन्यांच्या निरागस धृवांशीची गळा चिरून हत्या केली. त्याचवेळी भूषण यांची आई दूध घेऊन घरी आल्यानंतर सून बेशुद्धावस्थेत दिसली. तर नात धृवांशी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली दिसली. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर धृवांशी आणि तिच्या आईला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचाराआधीच धृवांशीचा मृत्यू (Death) झाला होता.

नाशिक हादरलं! आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची हत्या
सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचा 'या' तारखेपासून बेमुदत संप

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. तर मुलीची आई शुद्धीवर आली असून तिने एका महिलेवर (Women) संशय व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com