पुन्हा रुग्णालयास आग : तीन जणांचा मृत्यू

पुन्हा रुग्णालयास आग : तीन जणांचा मृत्यू

मुंबई:

नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर मुंबईतील विरर रुग्णालयास आग लागली होती. यानंतर ठाण्यातील मुंब्रा परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

Title Name
नाशिकनंतर दुसरी मोठी दुर्घटना : विरार रुग्णालयास आग: १३ जणांचा मृत्यू
पुन्हा रुग्णालयास आग : तीन जणांचा मृत्यू

बुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंब्रा याठिकाणी असणाऱ्या कौसा परिसरात एम एस प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयामध्ये ही आग लागली आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. या रुग्णालयामध्ये एकूण 20 रुग्ण होते पैकी 6 रुग्ण हे अतिदक्षता विभागात होते. या रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये हलवले जात होते, त्यावेळी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईंकांन पाच लाखाची मदत जाहीर केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. शिवाय जखमींना एक-एक लाख देण्याची घोषणा केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com