Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपोलीस महानिरीक्षक दोरजे, आयुक्त नांगरे पाटील, अधीक्षक डॉ सिंग यांची बदली

पोलीस महानिरीक्षक दोरजे, आयुक्त नांगरे पाटील, अधीक्षक डॉ सिंग यांची बदली

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा होती. अखेर या बदल्यांना आज मुहूर्त लागला आहे. नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकपदी…

- Advertisement -

छेरिंग दोरजे यांच्या जागी बागलाणचे भूमिपुत्र प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दोरजे यांची बदली तुरुंग महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तर तर नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दुसरीकडे नाशिकच्या ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांचीदेखील बदली झाली असून डॉ. सिंग या आता अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

आज राज्यातील ४५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये नाशिकमधील तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली झाली होती.

त्यांनतर, गमे यांना नाशिक विभागीय आयुक्तपदी बढती देण्यात आली. त्यांच्या जागी कैलास जाधव याची नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात आणि परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे सर्वच ठिकाणी आता नवे अधिकारी प्रमुख म्हणून धुरा सांभाळणार आहेत.

पवारांशी चर्चा करुन घेतला निर्णय

पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमार सिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

यावेळी कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, मुंबई डीसीपींच्या बदलीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्यानंतर सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा अंतिम झाली. त्याअधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतही मुख्यमंत्री यांची चर्चा झाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या