नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघे जागीच ठार

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघे जागीच ठार

सिन्नर । Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik pune highway) नांदुरशिंगोटे (Nandurshingote) परिसरात हॉटेल अन्विता समोर बुधवारी (दि.13) पहाटेच्या सुमारास उभ्या आयशरवर कार जाऊन आदळल्याने कारमधील तिघे जागीच ठार झाल्याची घटना घडली. मयत तिघेही औषध विक्रत्या कंपनीचे नाशिक येथील अधिकारी आहेत...

पुणेहून नाशिककडे जाणारी स्विफ्ट कार क्र. एम. एच. 15/ सी. टी. 1721 ही नांदुरशिंगोटे परिसरात आली असता, हॉटेल अन्विता समोर उभ्या आयशर क्र. टी. एस. 30/ टी. 8886 हिला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.

यामुळे कारमधील शरद गोविंदराव महाजन (39) रा. म्हसरुळ, नाशिक, भूषण बाळकृष्ण बदान (36) रा. पाथर्डी फाटा, नाशिक, राजेश तिवारी (34) रा. कल्याण, ठाणे हे तिघे जागीच ठार झाले.

कंपनीची पूणे येथील बैठक (Company meeting at pune) आटोपून ते नाशिकला परतत असताना हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची समस्याही निर्माण झाली होती.

यानंतर स्थानिकांच्या मदतीने तत्काळ रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. तिन्ही मृतदेह दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवगृहात आणल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने नांदूर-शिंगोटे आऊट पोस्ट येथे आणली.

Related Stories

No stories found.