Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात तिघांचा उष्माघाताने मृत्यू; नेमकी काय असतात लक्षणे?

नाशकात तिघांचा उष्माघाताने मृत्यू; नेमकी काय असतात लक्षणे?

नाशिक | Nashik

शहराचे तापमान आजही ४१ अंंश सेल्सीअसवर कायम राहीले आहे. उष्मा घाताच्या घटना घडू लागल्या आहेत. शहरात तीन जणांंचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दुपारी प्रवास करतांना उष्ण वारे व तळपत्या झळा सहन करतांना घामाघून व्हायला झाले आहे….

- Advertisement -

समोसा खाणाऱ्यांनो सावधान! चटणीत निघाले झुरळ; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ

नाशिकमधील वाढत्या उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे की, तीन नागरिकांचे चक्कर येऊन पडल्याने त्यांचा जीव गेला आहे. पोलिसनी या वृताला दुजोरा दिला आहे. प्रशासनाच्या माहीतीनुसार उत्तम खरात हे जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी आले होते. तेथे त्यांना चक्कर आली. डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दूसरी घटना नाशिक रोड मध्ये घडली. महाराष्ट्र अलटो इंजीनियर एंड रिसर्च अकादमीत सुरु असलेल्या राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी पंच म्हणुन बदलापुरचे विकास वामन भावे आले होते. ते पंच चे काम करत असतांनाच चक्कर आली.

मॅक्सवेलची वेडिंग पार्टी : विराटचा ‘पुष्पा’ डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

रुग्णालया नेल्यांतर त्यांचाही मृत्यू झाला. तिसरी घटना मखमलाबाद गावात घडली. नाशिक रोडचे मोहन वर्मा उधारी मांगणारे शिव प्रसाद वर्मा जवळ बसले होते. तेव्हा त्यांंनाही चक्कर आली. ते खाली पडले. त्यानाही रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. वाढत्या उष्णतेमुळे या घटना घडल्याचे डॉक्टरानी सांगितले.

अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये का रंगले ट्विटर वॉर? जाणून घ्या

उष्णता लागल्यानंतर चक्कर येणे, मळमळ होणे. उलट्या होऊ लागणे. डोके दुखणे, घाम येतो., थकवा येऊन स्नायूंना आकडी येते. शारीरिक तापमान (104 डिग्री पेक्षा जास्त होते. घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते. नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते.

Breaking News अंगावरून ट्रक गेल्याने महिलेचा मृत्यू ; दुचाकीस्वार गंभीर

रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो. शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होते, भ्रम होतो आणि बेशुद्धवस्था येते आणि मृत्यू ओढवतो. म्हणुन उष्माघाताची लक्षणे दिसताच संबंधित व्यक्तीला शक्यतो वातानुकूलित जागेत, सावलीत वा थंड ठिकाणी बसवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत.

मामाच्या गावी आलेल्या भाचीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

ओल्या कापडाने पुसावे. आजूबाजूला हवा खेळती ठेवावी. बर्फ व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत ठेवावा डॉ, राहुल सावंत यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या