तलावात बुडून तिघांचा मृत्यू

नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
तलावात बुडून तिघांचा मृत्यू

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

येथील नगरपरिषद (Municipal Council) तलावाजवळ (lake) फिरण्यासाठी आलेल्या तीन युवकांचा (Three Youths) शनिवार (दि. १८) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तलावात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...

तलावात बुडून तिघांचा मृत्यू
Photo Gallery : गोदाकाठावरील भगवान शंकरांच्या मंदिरांचे दर्शन घ्या एका क्लिकवर

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहनवाज कादिर शेख वय ४१ (मामा) रा. इगतपुरी हे रमिज अब्दुल कादीर शेख वय ३६ रा.भिवंडी व नदीम अब्दुल कादीर शेख वय ३४ रा. भिवंडी असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे तिघे मित्र इगतपुरी शहरातील (Igatpuri City) नगरपरिषद तलाव येथे फिरण्यासाठी आले होते. यावेळी दोघांनी अंघोळ करण्याचा निर्णय घेत तलावात उडी मारली. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. या दोघांना बुडताना पाहून तिसरा त्यांच्या मदतीला गेला असता तो देखील बुडाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

तलावात बुडून तिघांचा मृत्यू
“निवडणूक आयोगाने गुलामी केली, या गुलामांना मी आव्हान देतो की…”; उद्धव ठाकरे कडाडले

त्यानंतर तिघांना बाहेर काढण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी व स्थानिक युवकांनी तलावात बचाव कार्य सुरू केले. यानंतर काही तासांनी बुडालेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. यावेळी त्यांना तात्काळ इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तलावात बुडून तिघांचा मृत्यू
नाशिकचे सायक्लिस्ट करणार चार दिवसात १२०० किमी प्रवास

दरम्यान, यावेळी तिघांवर वेळेवर उपचार न झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पोलीस प्रशासन (Police Administration) परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.

तलावात बुडून तिघांचा मृत्यू
Mahashivratri 2023 : भाविकांच्या गर्दीने शिवमंदिरे गजबजली
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com