दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; पाच जखमी

दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; पाच जखमी

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

नाशिक - पुणे महामार्गावर (Nashik–Pune highway) मोहदरी घाटासह (Mohdari Ghat) नायगाव रोडवर (Naigaon Road) मापारवाडी (Maparwadi)येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना आज (दि.२३) सकाळच्या सुमारास घडली...

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहदरी येथे सकाळी ८ वाजेच्या सुमारास खाजगी प्रवासी वाहनाच्या अपघातात (Accident) पाच जण गंभीर जखमी झाले. नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात विना नंबर प्लेट असलेली मॅक्स सवारी हे खाजगी प्रवासी वाहन नाशिकहून सिन्नरकडे (Nashik to Sinnar) येत होते.

मोहदरी घाट चढताना सुरुवातीच्याच वळणावर ओव्हरटेक करताना प्रवासी वाहनाने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. यामुळे वाहनाच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला.

या अपघातात शारदा मोरे (४५) (Sharda More) रा. उद्योग भवन, सिन्नर या महिलेच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात संतोष गडाख (४४), मनिषा मुकेश सावंत (४०), ललीता प्रभाकर जाधव (५०), पुष्पा प्रदिप खंडारे (४७) रा. सर्व नाशिक रोड व शोभा कैलास शिंदे (४५) रा.देवळाली गाव या ५ जणांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर महामार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांनी महामार्ग पोलिस व एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

तसेच घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकाचालक गणेश काकड, गणेश गायकवाड, अजित सहाणे यांनी तात्काळ घटनास्थळी येत जखमींना स्थानिकांच्या मदतीने सिन्नरमधील खाजगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल केले.

तर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन अपघात ग्रस्त वाहनाला ताब्यात घेतले. यावेळी महामार्ग पोलिस उपनिरिक्षक वाय. एस. शिंदे, आर. एस. तडवी यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीसही खोळंबा झाल्याचे बघायला मिळाले.

तर दुसऱ्या घटनेत सकाळच्या सुमारास पल्सर दुचाकी क्र. एम. एच. १५ एच. एल. ३२९८ ने दोन तरुण माळेगाव एमआयडीसीतून (Malegaon MIDC) नायगाव रोडने सिन्नरकडे येत होते. मापारवाडी शिवारात ते आले असता समोरुन येणारी मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालयाची बस क्र. एम. एच. १५ ए. के. १४४३ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरुन रस्त्यावर पडल्याने ज्ञानेश्वर राजेंद्र भारस्कर (२४) (Dnyaneshwar Rajendra Bharaskar) रा. कोनांबे व अनिकेत नंदू खताळे (२२) (Aniket Nandu Khatale) करोळे, ता. इगतपूरी, हल्ली मु. सिन्नर या दोन्ही तरुणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी सिन्नर पोलिस (Sinnar Police) व रुग्णवाहिकेला याबाबत माहिती दिली असता स्थानिकांनी मदत करत दोघांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या अपघाताचा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक रामदास धुमाळ (Ramdas Dhumal) करत आहेत. तर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दोन्ही अपघातातील मृतांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com