Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात तीन पूल आणि सात रस्ते पाण्याखाली; एकजण वाहून गेला

नाशिक जिल्ह्यात तीन पूल आणि सात रस्ते पाण्याखाली; एकजण वाहून गेला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात असलेल्या धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे अनेक धरणातून विसर्गाला सुरुवात झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीत वाहत आहेत. यातच जिल्ह्यातील दोन पूल आणि सात रस्ते पाण्यामुळे बंद करण्यात आली आहेत….

- Advertisement -

दुसरीकडे, पळशी खुर्द ते चिखली दरम्यान असलेल्या नदीत एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. अद्याप ही व्यक्ती मिळून आलेली नसून शोध सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी ‘देशदूत’ला दिली.

दुसरीकडे जिल्ह्यातील, दिंडोरी तालुक्यात सहा ते सात रस्ते पाण्याखाली आहेत. याठिकाणी हे रस्ते वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक पूल जो शिरसगावकडून मुरंबीकडे जातो हा पूल पाण्याखाली गेला असून याठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध असल्यामुळे फारशी अडचण आलेली नाही.

देवळा तालुक्यातील सावकी ते विठेवाडी दरम्यान असलेला एक पूल पाण्याखाली गेलेला असून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

तिकडे निफाड तालुक्यातील रवळस पिंपरी याठिकाणी एक पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या