Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशDeath Threat Call : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींसह अमित शाह, नितीश कुमारांना...

Death Threat Call : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींसह अमित शाह, नितीश कुमारांना धमकीचा फोन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दिल्ली पोलिसांना आज (21 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister Amit Shah) अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांना जीवे मारण्याची धमकी देणारे दोन पीसीआर कॉल आले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस सतर्क झाले असून तात्काळ पोलिसांनी सुत्रे हलवत धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे…

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, दिल्लीच्या बाह्य जिल्हा पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी देणारे दोन कॉल आले, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक टीम रवाना करण्यात आली आहे.

ED Raids : ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीचा छापा; फडणवीस म्हणाले, “ज्या लोकांचे कनेक्शन…”

तसेच धमकीचा फोन करणाऱ्या तरूणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून संजय वर्मा असे धमकी देणाऱ्या तरूणाचे नाव आहे. संजय दिल्लीतील मादीपूर भागातील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो कालपासूनच दारू पित असून तो नशेत आहे. याच नशेत त्याने फोन केला असावा, असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. तसेच या प्रकरणाचा सर्वसमावेशक तपास पोलिसांनी सुरु केला असून संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान, देशातील बड्या नेत्यांना धमकी येण्याची ही पहिली वेळ नसून याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही मार्च महिन्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या