अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकीचा फोन

अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकीचा फोन

मुंबई | Mumbai

देशाचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) आणि चिरंजीव आकाश अंबानी (Akash Ambani) यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने रिलायन्स हॉस्पिटलच्या (Reliance Hospital) फोनवर फोन करून अंबानी कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसेच रिलायन्स हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात (D. B. Marg Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन (Threatening phone call) आला होता. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच संशयिताला ताब्यात घेतले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com