संघ मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी

संघ मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी

नागपूर | Nagpur

येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयाला उडवून देण्याच्या धमकीचा फोन (Threatening phone call) पोलिस कंट्रोल रूमला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागूपरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला एका अज्ञात फोनवरून (Unknown phone) पोलिस कंट्रोल रूमला धमकीचा फोन आल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच हा धमकीचा फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा (Security System) सतर्क झाल्या असून परिसरात तपासणी सुरू केली आहे. तर बॉम्ब शोधक पथक (Bomb Squad) देखील याठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com