Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या'अयोध्या में शंखनाद,आ रहे है एकनाथ' म्हणत नाशिकचे हजारो शिवसैनिक अयोध्याकडे रवाना

‘अयोध्या में शंखनाद,आ रहे है एकनाथ’ म्हणत नाशिकचे हजारो शिवसैनिक अयोध्याकडे रवाना

नाशिक रोड | प्रतिनिधी | Nashik Road

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा उत्तर प्रदेश मधील अयोध्या दौरा निश्चित झाला आहे या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ एप्रिलला लखनौला पोहोचतील आणि ९ एप्रिलला श्रीरामाचे दर्शन घेतील. त्याबरोबरच ९ एप्रिलला संध्याकाळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेणार आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे हे अयोध्याला ( Ayodhya) जाणार असल्याने आयोध्या-लखनौच्या रस्त्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अयोध्या दौऱ्याशी संबंधित पोस्टर्स लावण्यात आले आहेत. “श्री रामाच्या सन्मानासाठी हिंदुत्वाचा धनुष्यबाण घेऊन आयोध्येला जाऊया” अश्या आशयाची पोस्टर्स याप्रसंगी लावण्यात आली आहेत. या सोबतच एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौऱ्यानिमित्त एक टीझर ही रिलिज करण्यात आले आहे.

कोरोनाला तोंड देण्यासाठी सरकारने कसली कंबर; देशभरात ‘या’ दिवशी मॉक ड्रील

या दौऱ्यासाठी नाशिकवरूनही विशेष रेल्वेगाडी रवाना होणार आहे. नाशिकमधील बहुसंख्य शिवसैनिक या विशेष रेल्वेने (Nashik Ayodhya Special Train)अयोध्येला जाणार असून सुमारे 18 बोगीतून 1200 शिवसैनिक जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्याचाच एक भाग म्हणून ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ’ या बॅनरखाली अयोध्या दौऱ्याचा प्रचार सुरू केला आहे. यामुळे दौऱ्याच्या मार्गातील ठिकठिकाणचे कार्यकर्तेही जोडले जाणार आहेत.

दरम्यान आयोध्या येथे पूर्वतयारीसाठी अगोदरच नाशिक येथील शिवसेनेचे नेते व पदाधिकारी रवाना झाले आहेत, त्याचप्रमाणे नाशिकच्या (nashik) पदाधिकाऱ्यांवर अयोध्या येथे पूर्वतयारीसाठी आधीच जबाबदारी टाकण्यात आली आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते प्रवीण तिदमे यांचा समावेश आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर खासदार हेमंत गोडसे सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे शिवाजी भोर प्रभाकर पाळदे वैशाली दानी प्रताप मेहरोलीया आदींसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या