मातुलठाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस
मुख्य बातम्या

मातुलठाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस

हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली, उभी पिके भुईसपाट

Nilesh Jadhav

मातुलठाण | वार्ताहर | Matulthan

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण, नायगाव परिसरात शुक्रवारी रात्री वार्‍यासह ढगफुटी सदृश पाऊस झाला. तीन ते चार तास अति मुसळधार पावसामुळे उभे असलेले मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. आधीच अडचणीत असलेला बळीराजा हातातोडाशी आलेले पिके गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तरी शासनाने पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहे.

परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने यावर्षी वेळेवर पेरणी केली होती. आर्थिक संकटावर कशीबशी मात करुन बी-बियाणे, खते घेऊन पेरणी पूर्ण केली व पिकांना जोमात आणले होते. पिकांचे खते, खुरपणी आदी कामेही जवळजवळ पूर्ण झाले होते. परिसरात पाऊस योग्य प्रमाणात पडत असल्याने पिके जोमाने वाढली होती. यावर्षी चांगले उपन्न मिळेल या आशेने शेतकरी बसलेला होता. पण अचानक आलेल्या अति मुसळधार पावसाने शेतकर्‍यांचे तोडाचे पाणी पळाले. या पावसाने परिसर पूर्णपणे जलमय झाला होता.

ओढे-नाले भरभरून वाहत होते. अनेक ठिकाणी रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नैसर्गिक अपत्ती मुळे हातातोडांशी आलेले पीक गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तरी तातडीने पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाखाली क्षेत्र आहे. कमी खर्चात चांगले उपन्न मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली होती. पण यावर्षी सोयाबीनची उगवण क्षमता कमी असल्याने दोन ते तीन वेळा पेरणी करूनही सोयाबीनचा उतार कमी झाला होता. कशीबशी सोयाबीन उतरली होती. पण मुसळधार पावसामुळे पिकावर दोन ते तीन इंच पाणी साचले आहे. या पाण्यामुळे सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com