'या' मोहिमेतून एका दिवसात हजारोंचा दंड वसुल

'या' मोहिमेतून एका दिवसात हजारोंचा दंड वसुल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवीन नाशिक (navin nashik) घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत (Department of Solid Waste Management) प्रतिबंधित प्लास्टिकचा (Banned plastic) वापर करणाऱ्या

व्यवसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई (Penal action) मोहिम राबविण्यात येऊन ११ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल (Collection of fines) करण्यात आला.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या आदेशानुसार व संचालक घनकचरा विभाग डॉ.आवेश पलोड (Director Solid Waste Department Dr. Avesh Palod) यांच्या सूचनांनुसार विभागीय अधिकारी डॉ.मयुर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत (New Nashik Solid Waste Management Division) प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई मोहिम राबविण्यात आली.

त्याअंतर्गत प्रतिबंधीत प्लास्टिकचा (plastic) वापर करणे व इतर मुद्याप्रमाणे खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई (Penal action) करण्यात येऊन ११ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ह्या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक बी.आर.बागुल, आर.डी. मते, आर.आर.बोरीसा, रावसाहेब रुपवते, विशाल आवारे, सुशील परमार ,स्वच्छता मुकादम अजय खळगे, अशोक दोंदे, विजय गोगलिया, महेंद्र गांगुर्डे, मिलिंद जगताप,वाहनचालक विलास ढवळे आदी सहभागी होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com