Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजुनी पेन्शन योजनेसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

जुनी पेन्शन योजनेसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एकच मिशन-जुनी पेन्शन (Old Pension), कर्मचारी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी गुरुवारी नाशिक दणाणुन सोडले. गोल्फ क्लब मैदानापासुन ते छत्रपती शिवाजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅली काढुन त्यांनी आपल्या प्रश्नाची जाणीव करुन दिली. 

- Advertisement -

 2005 नंतर शासकीय सेवेत कार्यरत झालेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागु व्हावी. या मागणीसाठी सर्वच राज्य सरकारी  कर्मचारी संघटनांनी बेमुदत संप (strike) पुकारला. काल संपाचा तिसरा दिवस होता.

अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनरविरोधात तक्रार; काय आहे प्रकरण?

सकाळपासुनच आंदोलक कर्मचारी इदगाह मैदानावर जमत होते. बराच वेळ परवानगीचा घोळ सुरु होता. शेवटी बारा वाजेच्या सुमारास रॅलीस सुरवात झाली. जोरदार घोषण देत कर्मचारी त्र्यंबक नाका (Trimbak naka), गंजमाळ, शालीमार मार्गे छत्रपती शिवाजीरोड येथे जमले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कर्मचारी नेत्यांनी संपामागील भूमिका विषद केली. त्यांतर शिष्टमंडळाने जिल्हाधीकारी गंगाथरण डी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

मोठी बातमी! लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर कोसळलं; दोन्ही पायलट बेपत्ता

याप्रसंगी महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, नरेंद्र जगताप, सुनंदा जरांडे, कल्पना पवार, शरदचंद्र नामपुरकर, अजीत गायकवाड,  जि. प. कर्मचारी महासंघाचे अरुण आहेर, कर्मचारी युनियनचे विजयकुमार हळदे, लिपीक वर्गीय संघटनेचे प्रमोद निरगुडे, परिचर संघटनेचे विजय शिंदे, प्रयोगशाळा वैज्ञानिक चे मधुकर आढाव, पशुसंवर्धनचे भगवान पाटील,  विक्रम पिंगळे, मंदाकिनी पवार, अजित आव्हाड, आरोग्य कर्मचारी विजय सोपे, औषध निर्माण संघटनेचे विजय दराडे, लेखा कर्मचारी संघटनेचे दिनकर सांगळे, लिपीक हक्क संघटनेचे निलेश देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

निवेदनात, जुनी पेन्शन योजना लागु करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा नियमित करा, रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा ( scheme) लाभ द्या यासह इतर मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, त्र्यंबक नाका, गंजमाळ सिग्नल येथील वाहतुक एक तास ठप्प झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या