Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याहिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती- मुख्यमंत्री

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती- मुख्यमंत्री

खेड । वृत्तसंस्था

५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीच्या खेडमध्ये गोळीबार मैदानावर सभा झाली होती. आज त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही काही आज इथे किती गर्दी जमा होणार हे दाखविण्यासाठी आलो नसून आपणा सर्वांसमोर उपस्थित जनसमुदाय आपणास दिसत आहे. सरकार कुणाबरोबर स्थापन करावे याचा विचार करायला हवा होता. काँँग्रेस आणि राष्ट्रवादी काँँग्रेस सोबत सत्ता स्थापन करून शिवसेनेची विचार धारा सोडली म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला असे शिंदे म्हणाले.

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाढवायची आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सावरकर यांच्या विधानावर उद्धव ठाकरे काहीच का बोलत नाही. आम्ही हे कदापि सहन करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी काँँग्रेस पक्षाला नेहमी दूर ठेवले, त्याच काँँग्रेस पक्षाशी उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केली.पंतप्रधान मोदी यांनी काश्मीर मधील ३७० वे कलम रद्द केले. हिंदुत्वाची विचार धारा ठेवणारे भारतीय जनता पक्षा सोबत आम्ही गेलो. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे.

उद्धव ठाकरे यांना उद्देशून शिंदे म्हणाले की, तुम्ही तर म्हणाले होते कि मी शिवसैनिकांना पालखीत बसवेल. तुम्हाला सत्तेचा मोह झाला, तुम्हीच सत्तेची खुर्ची घेतली, पण जेव्हा हिंदुत्वाचा, सावरकरांचा विषय आला तेव्हा तुम्ही शिवसेनेची विचार धारा बदलली. रामदास कदमांची कारकीर्द संपविण्यासाठी कट कारस्थान करण्यात आले. कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा, मी आजही कार्यकर्ता आहे. पंतप्रधान मोदी व फडणवीस यांचे सोबत जाऊन मी शिवसेनेची विचार धारा जपली.

समुद्रात वाहून जाणारे पाणी , न्यू मांडवे प्रकल्प , कोकणातील सिंचन प्रकल्प, खेड नळ पाणी योजना, खेड- कोयना प्रकल्प , तसेच कोकणातील पर्यटन वाढी साठी उपाय योजना, फळ प्रक्रिया प्रकल्प, यांची अर्थ संकल्पात मंजुरी बाबतचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्याच प्रमाणे मंडनगड येथे औद्योगिक प्रकल्पासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या