साडेतीन हजारांचे बक्षिस मागणार्‍या लाचखोर धुळे पं.स.च्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात पकडले

साडेतीन हजारांचे बक्षिस मागणार्‍या लाचखोर धुळे पं.स.च्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात पकडले

धुळे । dhule। प्रतिनिधी

बिटच्या विभागीय लेखा परिक्षणाच्या नावाने बक्षिस (reward) म्हणुन साडेतीन हजारांची लाच घेणार्‍या (bribe taker) धुळे पंचायत समितीच्या बांधकाम (Construction Department of Dhule Panchayat Samiti) विभागातील कनिष्ठ सहाय्यक (junior assistant) श्यामकांत सोनवणे यांना रंगेहाथ (caught red-handed) पकडण्यात आले. आज दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.

साडेतीन हजारांचे बक्षिस मागणार्‍या लाचखोर धुळे पं.स.च्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात पकडले
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर... काळीज होईल खल्लास...

धुळे पंचायत समितीतील शाखा अभियंता या पदावर कार्यरत असलेले तक्रारदार हे एप्रिल 2022 पर्यंत रत्नपुरा बीट येथे नेमणुकीस होते. या कालावधीतील बिटचे विभागीय लेखापरिक्षण (ऑडीट) झाले होते. या झालेल्या लेखा परिक्षणांच्या नावाने बक्षिस म्हणुन कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे हे तक्रारदाराकडे सुमारे आठ ते दहा दिवसांपासुन वेळोवेळी प्रत्यक्ष भेटीत व मोबाईलवर कॉल करून 3 हजार 500 रूपये लाचेची मागणी करीत होते.

साडेतीन हजारांचे बक्षिस मागणार्‍या लाचखोर धुळे पं.स.च्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात पकडले
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज या तक्रारीची पडताळणी केली. त्यादरम्यान कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे यांनी तक्रारदाराकडे 3 हजार 500 रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडुन स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरूध्द देवपुर पश्चिम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साडेतीन हजारांचे बक्षिस मागणार्‍या लाचखोर धुळे पं.स.च्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात पकडले
VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस... करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल
साडेतीन हजारांचे बक्षिस मागणार्‍या लाचखोर धुळे पं.स.च्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात पकडले
विद्यापीठाचा यंदाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, भुषण शेटे,संतोष पावरा, गायत्री पाटील, प्रशांत बागुल रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहीणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

साडेतीन हजारांचे बक्षिस मागणार्‍या लाचखोर धुळे पं.स.च्या कनिष्ठ सहाय्यकास रंगेहात पकडले
VISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com