निष्ठेबाबत ज्ञान पाजळणाऱ्या आ.थोरातांनीच आता खुलासा करावा: विखे पाटील

निष्ठेबाबत ज्ञान पाजळणाऱ्या आ.थोरातांनीच आता खुलासा करावा: विखे पाटील

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कॉंग्रेसमध्‍ये (congress) सुरु असलेल्‍या घडामोडींबाबत निष्ठा आणि इतर बाबतीत ज्ञान पाजळणाऱ्या आ. बाळासाहेब थोरातांनीच (MLA Balasaheb Thorat) आता खुलासा करण्‍याची गरज असल्‍याचे मत महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्‍यक्‍त केले.

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचे शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) तिळगुळ देऊन महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्‍वागत केले. पदवीधर निवडणूकीच्‍या (election) पार्श्‍वभूमीवर या दोघांमध्‍ये झालेल्‍या गुप्‍त चर्चेने निवडणूकीतील संस्‍पेन्‍स अधिकच वाढला आहे. बीड येथील एका कार्यक्रमास जाण्‍यासाठी उपमुख्‍यमंत्री फडणवीस शिर्डी विमानतळावर १० मिनिट थांबले होते.

या दरम्‍यान पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी त्‍यांचे स्‍वागत केले आणि मकर संक्रांतीच्‍या पार्श्‍वभूमीवर तिळगुळ देऊन शुभेच्‍छा दिल्‍या. याप्रसंगी भाजपाचे (BJP) संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, श्रीरामपूरचे तालुकाध्‍यक्ष दिपक पठारे, राहाता तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, शिर्डी शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे, माजी नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, शिवाजीराजे धुमाळ आदि उपस्थित होते.

एकीकडे पदवीधर निवडणूकीतील घडामोडी वाढत असताना फडणवीस आणि विखे पाटील यांच्‍यामध्‍ये झालेल्या चर्चेचा तपशिल उघड झाला नसला तरी, या भेटीनंतर माध्‍यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी सत्‍यजीत तांबेंच्‍या (Satyajit Tambe) पाठींब्‍याबाबत सर्वोतोपरी निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असून पक्षाकडून ज्‍या उमेदवाराला पाठींबा दिला जाईल, त्‍याला निवडणून आणण्‍यासाठी आम्‍ही काम करणार असल्‍याचे त्‍यांनी ठामपणे सांगितले.

कॉंग्रेसमध्‍ये (congress) सुरु असलेल्‍या घडामोडींवर विचारले असता. विखे पाटील म्‍हणाले की, या घडामोडींबाबत निष्ठेचे धडे देणाऱ्या बाळासाहेब थोरातांनीच (Balasaheb Thorat) आता खऱ्या अर्थाने खुलासा करण्‍याची गरज असल्‍याचे मत व्‍यक्‍त करुन, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निश्चित होतील तेव्‍हा त्‍या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरातच घेतली पाहीजे, असा टोला त्‍यांनी दिला.

कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्‍व पक्षाच्‍या विचारांशी फारकत घेउन काम करीत आहे. भारत जोडो यात्रा कॉंग्रेससाठी नव्‍हेतर राहुल गांधीसाठीच असून, स्‍वत:ची छबी वाढविण्‍यासाठीच ही यात्रा आहे. या पक्षातून युवक मोठ्या संख्‍येने बाहेर पडत आहेत. भारत जोडो पेक्षा कॉंग्रेस छोडो हा कार्यक्रम वेगाने सुरु असल्‍यानेच कॉंग्रेसची आवस्‍था बिकट झाली असल्‍याची टिका त्‍यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com