राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस

साउथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमचा अंदाज
राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस

पुणे । प्रतिनिधी

भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागांत यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये सर्वसामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात सरासरीच्यावर पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पुर्वानुमान साउथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम तर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आले आहे.

येत्या हंगामातील (2021) अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची एकोणवीसावी दोन दिवसीय बैठक झाली. जगभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी प्रमाणे यंदाही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात झाली. भारतासह, अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांसह जागतिक हवामान संघटनेबरोबरच इतरही आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून माहिती विश्लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला.

मसॅस्कॉफफने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार करता दक्षिण आशियाच्या वायव्य भागासह, हिमालयाचा पायथा, इशान्य भाग, आणि मध्य आशियाच्या अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकेल. तर अफगाणिस्तान, पश्चिम पाकिस्तानसह अतिवायव्य भाग आणि पूर्व भारतातील राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे पुर्वानुमान साउथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आले आहे.

मसॅस्कॉफ मार्फत पावसाच्या अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार बहुतांश महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता 35 ते 45 टक्के आहे. संपुर्ण देशाचा विचार करता यंदा मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानात सरासरीवर पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. तर पश्चिम बंगाल, बिहार, जम्मूकाश्मिर मधील उत्तर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशांत महासागरात सध्या मला-निनाफ स्थिती निवळत असून, सर्वसाधारण एल निनो स्थिती निर्माण होत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com