
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. नाशिकमध्ये (Nashik) सकल मराठा समाज मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने दिवाळी सण साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...
नाशिकच्या (Nashik District) शिवतीर्थावर मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत विविध क्षेत्रातील, समुदायातील मंडळी उपस्थित होती. यावेळी ठराव घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने नाशिक शहर व जिल्ह्यात एकही घरात दिवाळी साजरी होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
तसेच मराठा समाजातील युवकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. राज्यात सुरु असलेल्या कुठल्याही हिंसक आंदोलनास सकल मराठा समाजाचे (Maratha Aarkashan) समर्थन नाही. मंत्री, आमदार, खासदार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, संसद, विधिमंडळात आवाज उठवावा, असे आवाहन मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे.