Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यायंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात; मनपा कडून 'हे' शुल्क माफ

यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात; मनपा कडून ‘हे’ शुल्क माफ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनानंतर दोन वर्षांनंतर गणेशोत्सव सण ( Ganesh Festival )यंदा धूमधडाक्यात साजरा होणार आहे. यात महापालिकेने ( NMC )देखील पुढाकार घेतला असून नवनियुक्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar)यांनी शहरातील सर्व गणेश मंडळांना खुशखबर दिली आहे.

- Advertisement -

त्यांनी गणेशोत्सवासाठी मनपाच्या सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणारी मंडप, स्टेज, कमान यांना परवाना शुल्क माफ (License fee waived )करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांसाठी हा मोठा दिलासा आहे.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी हा निर्णय लागू असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. यंदाच्या गणेशोत्सव अधिक जोमाने व्हावा तसेच गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, यासाठी मनपाने देखील अनेक निर्णय घेतले आहे.

यंदा ऑनलाइन पद्धतीने परवानगी देण्याची देखील सुविधा देण्यात आली असून शहरातील सर्व सहा विभागात एक खिडकी योजना देखील सुरू करण्यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले. गणेश मंडळांना परवानगीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत आधार कार्ड, हमीपत्र व जागेचा नकाशा जोडणे बंधनकारक आहे. त्यानंतर महापालिका पडताळणी करून परवानगी देणार आहे.

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमिवर गणेश मंडळांची मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयात बैठका घेण्यात येत आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव 2022 करीता मनपाच्या जागांवर उभारणी केलेले मंडप, स्टेज, कमान यांना परवाना शुल्क माफ करणेबाबत सर्व महानगरपालिकांना निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिक महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी परवाना शुल्क माफ करण्याबाबत आदेश दिले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचप्रमाणे मार्गावरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावरून जाणारे महापालिकेचे सिटीलिंक बसेसचे मार्ग देखील तात्पुरते स्वरूपात बदलण्यात येणार आहे. गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगीची सोय करून देण्यात आली असून एक खिडकी योजना देखील सुरू झाली आहे. गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करून धुमधडाक्यात सण साजरा करावा. मनपाचे सर्व प्रकारचे सहकार्य सर्व गणेशभक्तांना मिळणार.

-डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त तथा प्रशासक

- Advertisment -

ताज्या बातम्या