Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशयंदाची 'मन की बात' राहाणार विशेष.. काय आहे कारण? वाचा सविस्तर

यंदाची ‘मन की बात’ राहाणार विशेष.. काय आहे कारण? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांच्या मन की बात (Man ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांशी संवाध साधत असतात. येत्या ३० एप्रिलला या कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारीत होणार आहे. या १०० व्या भागाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथांच्या चरणी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण

हा भाग विशेष असण्याच कारण म्हणजे, या भागानिमित्त सरकारने १०० रुपयांचं नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच ३० एप्रिल २०२३ रोजी ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारित होणार आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेला मन की बातच्या या भागासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून देखील विशेष तयारी करण्यात येत आहे.

“दादा ज्याचं जळतं…”, सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना खरमरीत पत्र; ६ प्रश्न विचारून केली कोंडी

मन की बातच्या १०० व्या भागानिमित्त नाणे चलनात आणण्यात येणार असल्याने या नाण्यावर १०० व्या भागाचे प्रतिक म्हणून मायक्रोफोनचे चित्र आणि त्यावर २०२३ असे लिहिण्यात येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाण्याच्या वरच्या बाजूला देवनागरीमध्ये ‘मन की बात १००’ आणि इंग्रजीमध्ये ‘Mann Ki Baat 100’ असे सुद्धा लिहिलेले असेल.

अजित पवार म्हणाले, कोण संजय राऊत?; ‘वाचा’ नेमकं काय घडलं?

मात्र यंदा हे नाणं तांबे, रजत, निकिल आणि जस्त या चार धातूंपासून हे नाणे तयार करण्यात येणार आहे. साधारणतः ४४ मिलीमीटरचे नाणे तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या नाण्यामध्ये पुढील बाजूस अशोक स्तंभ असणार आहे. तर त्याच्या खाली “सत्यमेव जयते” असे लिहिलेले असेल. तसेच नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरीमध्ये ‘भारत’ आणि उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘INDIA’ असे लिहिलेले असेल.

नारायण राणेंविरोधात संजय राऊत आक्रमक, अब्रूनुकसानीचा दावा केला दाखल; नेमकं प्रकरण काय?

नरेंद्र मोदी यांनी याआधीदेखील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सलग चार वर्षांसाठी १०० रुपयांचं नाणं जारी केलं होतं तसेच नरेंद्र मोदी यांनी राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्तदेखील १०० रुपयांचं नाणं जारी केलं होतं. तसेच महाराणा प्रताप यांच्या ४७६ व्या जयंतीनिमित्त १०० रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं होतं. २०१०, २०११, २०१२, २०१४ आणि २०१५ सालीदेखील १०० रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं होतं.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या