उद्यापासून बदलणार 'हे' नियम; जाणून घ्या सविस्तर

उद्यापासून बदलणार 'हे' नियम; जाणून घ्या सविस्तर
देशदूत न्यूज अपडेट

मुंबई | Mumbai

वर्षातील सर्वात लहान महिना अशी ओळख असलेला फेब्रुवारी महिना (February Month) आज मंगळवारी संपणार असून यानंतर आर्थिक वर्षातील शेवटचा म्हणजेच मार्च महिन्याची सुरुवात होईल. ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिना सुरु होण्याआधी काही नियम सरकारने बदलले होते. त्याप्रमाणेच आता मार्चच्या सुरुवातीला अनेक नियम बदलण्याची शक्यता आहे. यामध्ये सोशल मीडिया, बँकेची कर्ज, एलपीजी सिलेंडर, बँकेच्या सुट्ट्या यासारख्या गोष्टींचा समावेश असून १ मार्चपासून हे नवे नियम लागू होणार आहेत...

नुकतेच काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रेपो रेट वाढवले आहेत. त्यामुळेच आता बँका एमसीएलआर दरांमध्ये वाढ करणार आहेत. याचा थेट परिणाम कर्ज घेणाऱ्यांबरोबरच ईएमआयवर पडणार आहे. तसेच कर्जाचे व्याजदर वाढणार असल्याने ईएमआयचा (EMI) भार देखील अधिक वाढेल. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांचा खिसा अधिक हलका होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

याशिवाय प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एपलपीजी, सीएनजी आणि पीएनजी गॅसचे दर निश्चित केले जातात. मागील वेळेस एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नाही. मात्र, यंदा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दर वाढवले जाण्याची शक्यता आहे. तर उन्हाळ्याच्या (Summer) पार्श्वभूमीवर ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये देखील बदल होणार आहे. मार्च महिन्यात ट्रेनच्या बदलेल्या वेळापत्रकाची घोषणा होऊ शकते.

तसेच सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या सोशल मीडिया (Social Media) संदर्भातील नियम देखील मार्च महिन्यात बदलू शकतात. यामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्वीटवर लगाम लावला जाऊ शकतो. तर धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट करण्यासंदर्भातील नियम लागू होणार आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या युझर्सकडून मोठ्या प्रमाणात दंड (Penalty) आकारला जाणार आहे.

त्याबरोबरच मार्च महिन्यात देशभरातील बँका १२ दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये अनेक प्रमुख सणांच्या दिवशी असलेल्या सुट्ट्यांचा सामवेश असून नियमित सुट्ट्याही या १२ दिवसांमध्ये गृहित धरण्यात आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार वेळेत पूर्ण करणे किंवा त्याच योग्य नियोजन करणे ग्राहकांसाठी फायद्याचे ठरु शकते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com