Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्रच्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने 'हा' ठराव मंजूर

मविप्रच्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने ‘हा’ ठराव मंजूर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ( Maratha Vidyaprasarak Sanstha ) विशेष सर्वसाधारण सभेत ( General Meeting of MVP ) उपाध्यक्षपद निवडीबाबत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.

- Advertisement -

मराठा हायस्कूलच्या प्रांगणातील कै. तुकाराम रौंदळ सभागृहात सभा झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे होते. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नानासाहेब महाले, भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, डॉ. जयंत पवार, उत्तमबाबा भालेराव, दत्तात्रय पाटील, प्रल्हाद गडाख, डॉ. प्रशांत देवरे, रायभान काळे, हेमंत वाजे, अशोक पवार, डॉ. विश्राम निकम, सचिन पिंगळे, सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते, नंदा सोनवणे, सुरेश बाबा पाटील, रामचंद्रबापू पाटील, डॉ शोभा बच्छाव, श्रीराम शेटे, डॉ. विलास बच्छाव, अरविंद कारे, आ. माणिकराव कोकाटे, पंडितराव पिंगळे, जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विश्वास मोरे, पुंडलिक थेटे, नानासाहेब दळवी, भरत कापडणीस, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी दुखवटा ठराव मांडला. स्वागत व प्रास्ताविकात 2010 ते 2022 या कालावधीत केलेल्या कामाचा अहवाल संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सभासदांसमोर सादर केला. त्यामध्ये संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, संस्थेच्या बजेटमध्ये 469 कोटी रुपयांची वाढ झाली. 137 नवीन शाखा सुरू केल्या.

विनाअनुदानित सेवकांच्या पगारात 12 वर्षांत 108 कोटी इतकी वाढ करण्यात आली. आपल्या कालखंडात 294 कोटी रुपये किमतीच्या एकूण 50 इमारतींचे बांधकाम पूर्ण केले. जमीन क्षेत्रात 336 एकर इतकी वाढ केली. संस्थेच्या ठेवी 14 कोटींवरून 72 कोटी रुपयांपर्यंत नेल्या. करोनाकाळात सेवकांना नियमित वेतन दिले. संस्थेमधील 2241 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 22 ने वाढ केली. आर्थिक बचतीवर भर दिला. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून अद्ययावत सुविधा पुरवल्या. त्याचप्रमाणे कोविड काळातील सेवाकार्य तसेच संस्थेने हाती घेतलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

संस्थेत उपाध्यक्षपद असावे यासाठी ही सभा होती. निवडीबाबत उपस्थित सभासदांनी आपले मत नोंदवून बहुमताने हा ठराव मान्य केला. त्यामध्ये अशोक नाईकवाडे, भास्करराव बनकर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, अभिमन्यू सूर्यवंशी, कैलास सूर्यवंशी, राजेंद्र पवार, मनोहर बापू, अंबादास बनकर, धनंजय राहणे, लक्ष्मण देशमुख, रवींद्र मोरे, ज. ल. पाटील, विजय वाघ, निवृत्ती महाले, कैलास बोरसे, अशोक थोरात यांनी उपाध्यक्षपदाच्या मागणीला पाठिंबा देऊन आजपासूनच या ठरावाची अंमलबजावणी व्हावी, असा निर्णय बहुमताने दिला.

उपाध्यक्षपद निवडीबाबतच्या विषयाचे वाचन सभापती माणिकराव बोरस्ते यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांनी तर आभार संचालक नानासाहेब महाले यांनी मानले. यावेळी कै. तुकारामजी रौंदळ सभागृहाचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी रौंदळ कुटुंबीयदेखील उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या