पुन्हा ऑपरेशन लोटस?; 'या' पक्षाचे सहा आमदार नॉट रिचेबल

पुन्हा ऑपरेशन लोटस?; 'या' पक्षाचे सहा आमदार नॉट रिचेबल

नवी दिल्ली | New Delhi

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) भाजपने शिवसेनेतील (Shivsena) एका गटासोबत सत्तास्थापन केल्यानंतर आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही (Delhi)सत्तांतराचे वारे वाहू लागले आहेत...

दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजप (Aam Aadmi Party and BJP) यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे भाजप दिल्लीत देखील 'ऑपरेशन लोटस' करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच 'आप'चे सहा आमदार (MLA) नॉट रिचेबल असल्याने खळबळ उडाली आहे..

दिल्लीत आम आदमी पक्षाचे ६२ आमदार असून पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी सर्व आमदारांना (MLA) आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या बैठकीपूर्वीच आम आदमी पक्षाचे काही आमदार संपर्कात नसल्याचे बोलले जात आहे.

तसेच आपचे नेते संजय सिंह (AAP leader Sanjay Singh) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भाजपकडून (BJP) आमदारांना आम आदमी पार्टी सोडल्यास २० कोटी आणि दुसऱ्या आणखी एका आमदाराला फोडल्यास २५ कोटी रुपये देण्यात येतील, असा आरोप केला होता.

दरम्यान, आपच्या संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि आणखी एका आमदाराला आप पक्ष सोडण्यासाठी २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com