धुळेकरांसाठी ही बातमी आहे खास.. गाठता येईल मुंबई फास्ट

jalgaon-digital
3 Min Read

धुळे dhule । प्रतिनिधी

धुळे ते मुंबई (Dhule to Mumbai)अशी स्वतंत्र रेल्वेची (independent railways) अनेक वर्षापासूनची धुळेकरांची मागणी खा.डॉ.सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांच्या प्रयत्नांमुळे अखेर पुर्ण झाली आहे. थेट धुळे रेल्वेस्टेशन ते मुंबई दादर स्टेशनपर्यंत (Dhule Railway Station to Mumbai Dadar Station) धावणारी रेल्वे सुरु करण्यास रेल्वेमंत्र्यांनी (Railway Minister) मंजूरी दिली आहे. सध्या स्थितीत सुरू असलेली मनमाड-दादर अमृतसर एक्सप्रेस आता धुळे रेल्वे स्थानकावरून सुटणार असून धुळे-मनमाड-दादर असा तिचा प्रवास असणार आहे. आठवड्यातून तीन दिवस प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतल्यानंतर ही रेल्वे रोज धुळेकरांचा सेवेत राहील. अशी माहिती खा.डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.

बोगी ऐवजी स्वतंत्र रेल्वेसाठी आग्रही

लॉकडाऊन काळात बंद झालेली मुंबई-बोगी धुळ्याकडे येणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. यामुळे प्रवाशांनी धुळे-मुंबई बोगीसाठी खा.भामरे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. खा.भामरे यांनी स्वतंत्र रेल्वेचीच मागणी लावून धरल्याने आणि तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांकडून तयार करून घेण्यात आल्याने धुळे-मनमाड-दादर अशी रेल्वे सुरू होण्यास रेल्वे बोर्डाचा हिरवा कंदील मिळाला आहे. ही रेल्वे प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून तीन दिवस आणि प्रतिसाद मिळूलागताच रोज ही रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. सकाळी साडेसहा वाजेला धुळे स्थानकावरून निघणारी ही गाडी दुपारी साधारणपणे दीड वाजेला मुंबईला पोहोचेल आणि तिकडून दुपारी साडेचार वाजेला निघेल व रात्री अकरा वाजेला धुळे स्थानकावर पोहोचेल.

खा.डॉ.सुभाष भामरे यांनी सातत्याने या रेल्वेसाठी प्रयत्न केल्याने धुळेकरांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. लवकरच ही रेल्वे सुरू होईल. अशी माहिती खा.सुभाष भामरे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, धुळे ते मनमाड या लोहमार्गावर अनेक तांत्रिक अडचणी असल्याने हा प्रश्न खितपत पडला होता. दरम्यान, मुंबईला जाण्यासाठी असलेली धुळेकरांसाठीची एक बोगीही बंद झाली होती. एका बोगीतून अधिकाधिक प्रवाशांना जाणे-येणे शक्य नसल्याने खरेतर अपेक्षित समाधान मिळत नव्हते.यामुळे अनेक डबे असलेल्या थेट रेल्वेचा विचार पुढे आला आणि खा.डॉ.भामरे यांनी स्वतंत्र रेल्वेची मागणी लावून धरली होती.

खा.सुभाष भामरे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून धुळे-मनमाड- दादर अशी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी.अशी मागणी लावून धरली होती. यासाठी अनेकदा दिल्ली मुंबई आणि भुसावळ या ठिकाणी चर्चा आणि बैठकाही झाल्या.अखेर या नव्या रेल्वेसाठीचे प्रस्ताव तयार करण्यात आले.या प्रस्तावाला आता हिरवा कंदील मिळाला असून धुळे-मनमाड-दादर म्हणजेच मुंबई ही रेल्वे धुळेकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून तीन दिवस आणि अपेक्षित प्रतिसाद मिळू लागताच रोज धुळे-मुंबई आणि मुंबई-धुळे असा प्रवास करण्यासाठी धुळेकरांना या रेल्वेचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनकुमार वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे खा. भामरे यांनी आभार मानले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *