Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीत यावे; 'या' आमदाराची ऑफर

पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीत यावे; ‘या’ आमदाराची ऑफर

मुंबई | Mumbai

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पुण्याईने भाजपा (BJP) पक्ष वाढला, मात्र सूडाचे राजकारण करुन त्यांच्याच मुलीचा पराभव केला. पक्ष वाढवणाऱ्यांचेच पंख छाटले जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) यावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी दिला आहे.

- Advertisement -

यावेळी मिटकरी म्हणाले की, राज्यपाल (Governor) १२ आमदारांची यादी लवकरच मान्य करतील. पण त्या यादीत दुर्दैवाने पंकजा मुंडेंचं नाव नाही. म्हणजेच, आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पक्ष छाटले जातात.

रोहिणी खडसेंना (Rohini Khadse) हे कळले आणि त्या लगेच राष्ट्रवादीत आल्या, आता पंकजा मुंडेंनाही याची जाणीव असेल. तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे बाजूला ठेवत आहे, हे ओळखणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे जेलमध्ये जाणार होते, पण ते शिंदे गटात (Shinde Group)गेले. यशवंत जाधवही (Yashwant Jadhav) शिंदे गटात गेले, त्यामुळे सगळे भाजपच्या वॉशिंग पावडरमध्ये धुवून निघाले आहे.

भावना गवळींनी (Bhavna Gawli) तर शिवबंधन काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना राखी बांधली आणि ईडी (ED) पिडा टळो असे म्हटले असेल. त्या पण वाशिंग पावडरमध्ये सारख्या साफ झाल्या आहेत, अशी टीकाही मिटकरींनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या