राज्यातील 'या' स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घोषित; मे महिन्यात मतदान

राज्यातील 'या' स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घोषित; मे महिन्यात मतदान

मुंबई | Mumbai

सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर शहर आणि जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुकांना प्रतीक्षा लागली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने महत्वाची घोषणा केली आहे..

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील असंख्य जागा विविध कारणांनी रिक्त झाल्या आहेत. या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा (elections) करण्यात आली आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commissions) ग्रामपंयतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे.

निधन, राजीनामा, सदस्यत्व रद्द झालेले अथवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे.

राज्यातील 'या' स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घोषित; मे महिन्यात मतदान
कोरोनाने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतींतमधील (Gram Panchayat) रिक्त जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींमधील एकूण ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुका होणार असून, त्यासाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज देण्यात आली आहे.

यासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालेली आहे. दरम्यान, नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत दाखल करता येणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे रोजी होईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नामनिर्देशनपत्रे ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे ही वाटप करण्यात येणार आहे. १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मात्र, नक्षलग्रस्त व दुर्गम भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी १९ मे रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com