नगरपरिषद सदस्यपद आरक्षण सोडती बाबत राज्य निवडणूक आयोगाची 'ही'माहिती

नगरपरिषद सदस्यपद आरक्षण सोडती बाबत राज्य निवडणूक आयोगाची 'ही'माहिती

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यभरातील 216 नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या ( Nagarparishad's )सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून रोजी आरक्षण सोडत ( Reservation Draw ) काढण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने 15 ते 21 जून या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

आरक्षणाची सोडत काढण्यात येणार्‍या 216 मध्ये 208 नगरपरिषदा आणि आठ नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल.

आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी शुक्रवारी (दि.10) नोटीस प्रसिद्ध करतील. 13 जून रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून या कालावधीत दाखल करता येतील.

संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com