Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागौण खनिज विभागाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा 'हा' महत्वपूर्ण आदेश

गौण खनिज विभागाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा ‘हा’ महत्वपूर्ण आदेश

नाशिक l प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील गौण खनिज विभागाचा ( Subordinate Mineral Division)कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी ब्रम्हगिरी किंवा अन्य कोणता डोंगर पोखरण्यावरून नाही तर अपर जिल्हाधिकारी यांच्याकडून कार्यभार काढून घेण्याच्या आदेशावरून चर्चेत आला आहे. जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी याबाबतचे आदेश काढले असून आता या विभागाचे कार्यालयीन कामकाज गौण खनिज विभागाकडून तर संचिका उपजिल्हाधिकारी प्रशासन यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे येणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हाधिकारी गांगथरण डी यांनी मंगळवारी याबाबत आदेश काढत अपर जिल्हाधिकार्‍यांचे गौणखनिज विषयक अधिकार स्वतःकडे वर्ग केले आहेत. तसेच अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुक, साठवणुक याबाबत कनिष्ठ अधिकार्‍यांनी केलेल्या आदेशाविरूध्द अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल होणार्‍या अपिलांचे, पुनरिक्षणाचे कामकाज हे देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे चालवण्यात येईल असे सुचित करण्यात आले आहे.

अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याविरुद्ध यापूर्वी देखील जानेवारी महिन्यात या प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी निवासस्थानी कार्यालयीन कामकाज असलेले दप्तर ठेवले असल्याचे निदर्शनास आले होते. आता देखील गौण खनिज विभागात अनागोंदी कारभार असल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केली असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात रंगत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या