हा तर आश्चर्याचा धक्का - राष्ट्रवादी काँँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

हा तर आश्चर्याचा धक्का - राष्ट्रवादी काँँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

पुणे | प्रतिनिधी Pune

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचं राजभवनात शपथविधी झाला.दरम्यान ,राष्ट्रवादी काँँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे आज पत्रकार परिषद घेतली.

गेले काही दिवस आसाम राज्यामध्ये महाराष्ट्रातील काही आमदार गेले होते, त्यात महाराष्ट्र राज्यातील नेतृत्व बदलाची मागणी केली होती. अनपेक्षित घड्मोडीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले तर देवेंद्र फडणवीस यांना भाजपाच्या वरीष्ठांच्या आदेशां नंतर उपमुख्यमंत्री बनविण्यात आले. राजकारणात अशा घडामोडी होतच असतात. अडीच वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. तरीही त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. हा तर आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला की त्यामध्ये तडजोड नाही, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.

आघाडी सरकारच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्णपणे जवाबदारी सोपविली होती. बहुमत नसल्याकारणाने उद्धव ठाकरे यांनी सत्तेला न चिकटता राजीनामा दिला असेही पवार यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com