Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादिवाळखोरीतील सहकारी संस्थासाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

दिवाळखोरीतील सहकारी संस्थासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नागपूर | प्रतिनिधी Nagpur

राज्य सरकारचे भाग भांडवल असलेल्या आणि तोट्यात अथवा दिवाळखोरीत गेलेल्या सहकारी संस्थांचे पुनर्वसन (Rehabilitation of Co-operative Societies )करता यावे, यासाठी राज्य सरकारने मालमत्ता पुनर्गठन कंपनी (Asset Restructuring Company) स्थापन केल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

- Advertisement -

राज्यातील सहकारी संस्था वाचल्या पाहिजेत आणि या संस्था कमी किमतीत खासगी व्यक्तींच्या घशात जाऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीसस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र आकस्मिकता निधी सुधारणा अध्यादेश २०२२ सभागृहाच्या पटलावर ठेवला. त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही शंका उपस्थित केल्या.

त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, तोट्यात अथवा दिवाळखोरीत गेलेल्या सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने यासारख्या संस्था लिलावा कमी किमतीत विकत घेऊन नफा कमावला जातो. यातून सरकारचे शासनाचे नुकसान होते. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि कारखान्याचे पुनर्वसन करण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या