Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअनुचित प्रकार रोखण्यासाठी ग्रामपालिकेचा 'हा' उपक्रम

अनुचित प्रकार रोखण्यासाठी ग्रामपालिकेचा ‘हा’ उपक्रम

नामपूर । वार्ताहर Nampur

शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने गावातील चांगल्या-वाईट घडामोडी तात्काळ लक्षात येण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामपालिकेच्या वतीने महत्वाच्या 18 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कार्यालयातून या सर्व ठिकाणांचे निरीक्षण करण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती सरपंच रेखा पवार यांनी दिली.

- Advertisement -

बागलाण तालुक्यात नामपूर ( Baglan Taluka- Nampur ) सर्वात मोठे मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे. गावात सोमवारी आठवडे बाजार भरतो, बुधवारी जनावरांचा बाजार भरतो, तसेच दररोज भुसार व कांदा मार्केट भरत आहे. यामुळे मोठ्या संख्येने व्यापारी व नागरीक, शेतकरी व्यवहाराच्या दृष्टीकोनातून नामपूर येथे भेट देत असल्याने गावात सदैव वर्दळ राहते. या व्यतिरिक्त वर्षाकाठी आई भवानी मातेची यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो.

गावाची 30 हजाराच्या आसपास लोकसंख्या पोहचली असून ग्रामीण भागातील 52 गावांच्या संपर्कामुळे देखील गाव सदैव गजबजलेले असते. मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून नामपूरला लहानमोठ्या चोर्‍याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगार शोधण्यात पोलीस प्रशासनाला सुद्धा खूपच अडचणी येत आहे. या दृष्टीकोनातून गावात अनुचित प्रकार घडू नये तसेच सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने ग्रामपालिकेच्या सर्व सदस्यांनी एकत्रितपणे गावात प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे ( CC TV Camera ) बसविण्याचा निर्णय घेतला होता.

याची अंमलबजावणी करत 18 ठिकाणी हे कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून यामार्फत वेगवेगळ्या ठिकाणचे कॅमेरांद्वारे टिपलेले छायाचित्र ग्रामपंचायत कार्यालयात दिसत आहे. त्यामुळे 18 जागांवर ग्रामपालिकेतून लक्ष ठेवले जात असल्याने या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले असल्याची माहिती सरपंच रेखा पवार यांनी दिली. जिल्ह्यात नामपूर ग्रामपालिका नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासोबत जनतेच्या अडचणी घडामोडी ग्रामपालिकेच्या कार्यालयात एकाच ठिकाणी बसून तात्काळ समजण्यासाठी कॅमेरे बसवण्याचा योग्य निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोद सावंत यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या