नाशिकच्या ओझर विमानतळावर आता 'या' सुविधेचा निर्णय

एचएएल उभारणार दूसरी धावपट्टी
नाशिकच्या ओझर विमानतळावर आता 'या' सुविधेचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एचएएलद्वारे (HAL ) संचालित नाशिक विमानतळ ( Nashik Airport) 4 डिसेंबर 2022 पासून उड्डाण संचालनासाठी पुन्हा उघडण्यात आले आहे.एअरपोर्ट ऑपरेटर विमान कंपन्यांना नाशिककडे आकर्षित करण्यासाठी एअरोनॉटिकल तसेच नॉन-एरोनॉटिकल शुल्कात एचएएलने मोठी सवलत जाहीर केली असून, ऑपरेशनच्या सुरुवातीच्या काळात रात्री मोफत पार्किंगची सवलत दिली आहे.त्यामुळे नजिकच्या काळात नाईट लँडींग वाढण्याची शक्यता वतवली जात आहे.

विमानतळ सुरक्षा वाढवण्यासाठी टर्मिनल बिल्डिंग, एटीसी, रनवे आणि पार्किंग ऍप्रन इत्यादींचा समावेश असलेल्या संपूर्ण एरोड्रोम परिसरात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक तंत्रज्ञान डिजिटल सिस्टीमसह बदलण्याची एचएएलद्वारे योजना तयार करण्यात येत आहे.

एचएएल उभारणार दूसरी धावपट्टी

ओझर विमानतळावर भविष्यात नागरी उड्डाणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासह ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी नवीन समांतर दुसर्‍या धावपट्टीची योजना आखण्यात आली आहे. अतिरिक्त टॅक्सी वे लिंकसह विमान पार्किंगसाठी सध्याच्या नागरी ऍप्रनचा विस्तार प्रस्तावित आहे.

इंधन कंपन्यांची उपलब्धता

विमानांना लागणार्‍या इंधनची पूर्तता करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी एचएएल परिसरात आधीच उपलब्ध आहे. बीपीसीएल कंपनीने देखील नागरी उड्डाणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विमानतळ परिसरात आपले इंधन भरण्याचे स्टेशन स्थापन केले आहे.

एमआरओची पूर्तता

विमान विश्रांतीला आले सताना त्यांच्या यंत्रणांची तपासणी व दूरूस्तीसाठीचे एमआरओ यंत्रणा विमानतळावर उपलब्ध आहे. भविष्यातील विमानतळ विकास योजनांमध्ये कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत ऑपरेशनल सहाय्यासाठी अत्याधुनिक रनवे व्हिज्युअल रेंज(आव्हीआर) मापन उपकरणांची स्थापना आणि डॉप्लर(व्हिएचएफ), ओम्नी रेंज(डीव्हिओआर) यांचा समावेश आहे.

ओझर विमानतळावर दूरुस्ती काम केल्याने, विमानतळावर निर्माण करर्‍यात आलेल्या प्रगत क्षमतांचा वापर विमान कंपन्यांना फायदेशीर होईल. तसेच विमान चालक ओझर विमानतळाचा वापर रात्रीच्या पार्किंगसाठी आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी करू शकतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com