नाशिकमध्ये प्रथमच 'या' मोहीमेची होणार सुरुवात

नाशिकमध्ये प्रथमच 'या' मोहीमेची होणार सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येत्या प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day) औचित्य साधून, नासिकमध्ये (nashik) प्रथमच ई-यंत्रणा! ई-कचरा संकलन मोहीमेची (E-waste collection campaign) सुरुवात होणार आहे.

या मोहिमेचा शुभारंभ, राष्ट्रीय युवा दिनी, स्वामी विवेकानंद जयंती (Swami Vivekananda Jayanti) निमीत्त 12 जानेवारी रोजी नाशिक फर्स्ट, ट्रॅफिक एज्युकेशन पार्क (Traffic Education Park), मुंबई नाक्याजवळ संध्याकाळी 5. 30 वाजता होणार आहे.

नाशिक चॅप्टर, पूर्णम इकोव्हिजन पुणे (Nashik Chapter, Purnam Ecovision Pune) आणि पर्यावरण संरक्षण ग्रुप (Environmental Protection Group) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ई-यंत्रण ही ई-कचरा संकलन मोहीम (E-waste collection campaign) राबविण्यात येत आहे.

आजच्या टेक्नो-सॅव्ही (Techno-savvy) जगात, तंत्रज्ञानाची कास धरून आपण चुटकीसरशी कार्यालयीन, शैक्षणिक (academic) आणि वैयक्तिक कामे पार पाडत आहोत. यामुळे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल (Electrical) आणि स्मार्ट गॅझेट्सचा (Smart gadgets) वापर आणि खप प्रचंड प्रमाणात वाढला असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वेस्ट (Electronic waste) अर्थात ई-कचरा अखंडपणे निर्माण होत आहे.

मात्र पर्यावरणपूरक (eco friendly) पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !! अवैज्ञानिक पद्धतींनी ई-कचर्‍याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण (Soil pollution) होत आहे , ज्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम होतो. म्हणुन हा निण4य घेण्यात आला आहे. नासिक मधील सर्व ओद्योगिक संस्था, शैक्षणिक संस्था, रहिवासी सोसायटी यांना पुढे येऊन ई-कचरा संकलन केंद्र म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या कार्यालयातील, संस्थेतील आणि घरातील ई-कचरा, 24, 25 आणि 26 जानेवारी 2023 या दिवसांमध्ये, आपल्या जवळच्या ई-कचरा संकलन केंद्रावर नेवून देण्याचे नागरिकांना करण्यात आले आहे. नाशिकमध्ये प्रथमच अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अणेक मोठ्या औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

ई-कचरा म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणे आणि त्यांचे भाग जे ग्राहक पुन्हा वापरत नाहीत. ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर-2020 नुसार, चीन आणि यूएस नंतर भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ई-कचरा उत्पादक देश आहे. विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीमध्ये घातक पदार्थ (शिसे, पारा, कॅडमियम इ.) वापरला जात असल्याने मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.

विषारी पदार्थांमुळे मेंदू, हृदय, यकृत, किडनी यांचे नुकसान होते. अशा प्रकारे निर्माण होणारा कचरा जगभरात झपाट्याने वाढत आहे. भारतात 95 टक्के ई-कचरा असंघटित क्षेत्राकडून पुनर्वापर केला जातो, त्यामुळे या विषयावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी हा उप्रम महत्वाचा ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com