Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर

Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

लातूर जिल्ह्यातील (Latur District) किल्लारी गावात (Killari Village) ३० सप्टेंबर १९९३ रोजी मोठा भूकंप (Earthquake) झाला होता. आज या भूकंपाला तीस वर्ष झाली आहेत. त्यावेळी संपूर्ण किल्लारी गाव साखर झोपेत असताना पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी अचानक हादरे जाणवायला लागले. त्यानंतर पुढे काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं. अनेक घरे जमीनदोस्त झाली, हजारो लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले. यामध्ये हजारो लोकांनी (People) आपला जीव गमावला तर हजारो जनावरांचा मृत्यू (Death) देखील झाला...

या घटनेचा उल्लेख आजही ऐकायला मिळाला की अंगावर शहारे उभे राहतात. तसेच या भूकंपानंतर हजारो मदतीचे हात धावून आले. यामधून देशाला आपत्ती व्यवस्थापनाचा (Disaster Management) आदर्श या भूकंपाच्या पुनर्वसनाने दाखवून दिला. मात्र, हा किल्लारीचा भूकंप नेमका कसा झाला होता. हे अद्यापही काही लोकांना माहिती नाही. त्यामुळे आज या किल्लारी भूकंपाच्या घटनेला तीस वर्ष जरी पूर्ण झाली असली तरी तीस वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे.

Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर
OBC Reservation : ओबीसी महासंघाचे २१ दिवसानंतर उपोषण मागे; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांचे आश्वासन

लातूर जिल्ह्यातील आणि सोलापूरच्या (Solapur) ईशान्येला ७० किमी अंतरावर असलेल्या किल्लारी गावाला ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी अचानक हादरे जाणवले आणि त्यानंतर मोठा भूकंप झाला. हा भूकंप ६.४ रिश्टर स्केलचा होता. त्यावेळी या भूकंपात ७ हजार ९२८ लोकांनी आपला जीव गमावला होता. तर १६ हजार लोक जखमी झाले होते. तसेच १५ हजार ८५४ जनावरे मृत्यूमुखी (Animals Die) पडली होती. हा भूकंप केवळ किल्लारी पुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या ५२ गावांवर त्याचा प्रभाव पडला होता. याशिवाय ३० घरे देखील जमीनदोस्त झाली होती. तसेच १३ जिल्ह्यातील २ लाख ११ हजार घरांना तडे गेले होते. त्यावेळी लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला होता. ज्यात लोकांनी आपलं सारं गमावले होते.

दरम्यान, किल्लारी भूकंपाच्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शरद पवार (Sharad Pawar) होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ किल्लारी येथे दाखल झाले होते. हा भूकंप घडल्यानंतर ५२ गावांत अनेक वेळेस शरद पवार जाऊन आले. त्यातील अनेक लोकांचा थेट शरद पवार यांच्याशी आजही संपर्क आहे. शरद पवार यांचे नियोजन आणि कामाच्या झपाट्यामुळे किल्लारीसह ५२ गाव या धक्क्यातून सावरली होती. दरवर्षी ३० सप्टेंबरला याठिकाणी भूकंपात बळी पडलेल्यांना मानवंदना दिली जाते.

Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर
Rahul Narvekar : मुख्यमंत्र्यांनंतर विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, ठाकरे गटाची चाल यशस्वी?

असं झालं पुनर्वसन

किल्लारी भूकंपावेळी बाधित झालेल्या गावांची गरज लक्षात घेऊन त्या गावांसाठी जमीन संपादित करण्यापासून सुरुवात झाली होती. त्यावेळी ५२ गावांचे पुनर्वसन करण्याच्या या प्रकल्पावर १२०० कोटींचा खर्च होता. जागतिक बँकेची या प्रकल्पाच्या खर्चावर देखरेख होती. सरकारने लोकसहभाग प्राप्त करून हा प्रकल्प राबविणे अपेक्षित होते. पूर्ण गाव वसवणे अशा प्रकारचा देशातील हा पहिलाचा प्रकल्प होता. यात ५२ गावांचे स्थलातंर आणि पुर्नवसन २३ हजार नवीन घरे बांधणे, विविध संस्था आणि देणगीदार यांच्या सहकार्यातून साडेपाच हजार घरे बांधून घेणे, तीस हजाराच्या आसपास घरे आहेत तेथेच बांधून देणे किंवा दुरुस्त करून देणे, त्याचप्रमाणे १३ जिल्ह्यातील अडीच हजार गावातील दोन लाखांपेक्षा जास्त घराचे दुरुस्ती करणे ही कामे हातात घेण्यात आली.

यानंतर प्रत्यक्षात काम सुरु झाल्यावर सर्वात प्रथम संपादित जमिनीवर रस्ते करण्यापासून सुरुवात झाली. मुख्य रस्त्याबरोबर अंतर्गत रस्ते, नाले, पिण्याच्या पाण्याची सोय, पाईपलाईन, वीज पुरवठा, खेळाचे मैदान, शाळेची इमारत, ग्रामपंचायत, आरोग्य, वाचनालय या साथीच्या इमारती यांची आखणी आणि बांधणी करत गावातील लोकांच्या नोंदीनुसार घराचे वाटप अशा अनेक टप्प्यातून हे पुनर्वसन पार पडले. मात्र ही सर्व घरे बांधताना पुन्हा भूकंप होईल अशी शक्यता लक्षात घेऊन भूकंप रोधक घरे बांधण्यात आली आहेत. ३० वर्षांनतरही गावे आता सुधारित सरकारी निवासस्थाने वाटतात.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर
बिग बॉस फेम अर्चना गौतमला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण? व्हिडिओ झाला व्हायरल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com