भीषण अपघात! ट्रकची ३ बसेसला धडक; १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी

अपघात | Accident
अपघात | Accident

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) सिंधी जिल्ह्यात (Sindhi District) ट्रक आणि एसटी बसेसचा (Trucks and ST Buses) भीषण अपघात घडला असून १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसेसला जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू तर ५० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. या बसेस सतना येथील कार्यक्रमातून परतत असल्याचे बोलले जात आहे. तसेच ही धडक इतकी भीषण होती की, यातील दोन बस खड्ड्यात पडल्या. तर एक बस त्याच रस्त्यावर उलटली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर जखमींपैकी ५ ते ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात असून अपघातानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह (CM Shivraj Singh) यांनी जखमींच्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com