Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशवाहन धारकांना मोठा फटका :इन्शुरन्स प्रिमियममध्ये होणार वाढ

वाहन धारकांना मोठा फटका :इन्शुरन्स प्रिमियममध्ये होणार वाढ

ट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे (Petrol Diesel Price)हैराण झालेल्या वाहन धारकांना आणखी एक झटका बसणार आहे. देशातील करोडो वाहनधारकांचा इन्शुरन्स प्रिमियम वाढण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांनी विम्याचा हप्ता वाढवण्याची (insurance premium hike) मागणी आयआरडीएआय (IRDAI)कडे केली आहे. यामुळे थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स (Third party motor insurance) 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

- Advertisement -

विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याची मंजुरी देण्याची मागणी केली आहे. कंपन्यांची ही मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील करोडो वाहनधारकांवर होणार आहे.

IRDAI च्या 2021 च्या वार्षिक अहवालानुसार, नॉन-लाइफ इन्शुरन्स कंपन्यांत थर्ड पार्टी विमाचा व्यवसाय 25 टक्के आहे. अहवालात असेही म्हटले आहे की थर्ड पार्टी विम्याच्या नूतनीकरणात कंपन्यांनी प्रीमियममध्ये 40,000 कोटी रुपये जमा केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या