Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेश'करोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य!', AIIMS च्या प्रमुखांचं मोठं विधान

‘करोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य!’, AIIMS च्या प्रमुखांचं मोठं विधान

दिल्ली | Delhi

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले आहे. तर, दुसरीकडे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. दरम्यान भारतात पुढील सहा ते आठ आठवड्यात करोनाची तिसरी लाट येणार असून ती टाळता येणं अशक्य असल्याचं मोठं विधान AIIMS चे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी केलं आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलतांना हे विधान केलं आहे.

- Advertisement -

रणदीप गुलेरिया म्हणाले की, देशात दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र, पुढील सहा ते आठ आठवड्यात म्हणजेच दोन महिन्यात देशात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. तिसऱ्या लाटेला रोखणं अशक्य आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य असू शकते, असेही ते म्हणाले.

तसेच, ‘आपण अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असून लोकांकडून पुन्हा नियमांचं उल्लघंन होत असल्याचं निदर्शनास येत आहे. असं वाटतेय की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जे झालं, त्याकडून आपण काहीच शिकलेलो नाही. बाजारपेठांमध्ये पुन्हा गर्दी होत आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर होत नाही. लोकांच्या याच निष्काळजीपणामुळे देशात तिसरी लाट अटळ आहे. पुढील सहा ते आठ आठवड्यात देशात पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात होईल. लोक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे देशात तिसरी लाट अटळ आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

हॉटस्पॉटच्या ठिकाणी आक्रमकपणे काम करण्याची गरज

लसीकरण हे मुख्य आव्हान आहे. नवी लाट तीन महिन्यांचा कालावधी घेऊ शकते, पण इतर गोष्टींवर अवलंबून असल्याने ही वेळमर्यादा कमीदेखील होऊ शकते. करोनासंबंधित नियमांसोबतच लक्ष ठेवणंही महत्वाचं आहे. गेल्यावेळी नवा विषाणू जो बाहेरुन आला आणि येथे विकसित झाला यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. हा विषाणू सतत बदलत राहणार आहे. हॉटस्पॉटच्या ठिकाणी आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे, असं रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या