Friday, April 26, 2024
HomeजळगावCrime Story# बुरखा घालून न्यायालयात घेणार होते...

Crime Story# बुरखा घालून न्यायालयात घेणार होते…

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मुलाच्या खून करणार्‍या (Murder of a child) संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार होते. त्या संशयितांवर (suspects) गोळ्या झाडून (firing bullets) खूनाचा बदला (Revenge of murder) घेण्यासाठी बुरखा घालून न्यायालयाच्या आवारात दबा धरुन बसलेल्यांचा कट वाहतुक पोलिसाच्या सतर्कतेमुळे शहर पोलिसांनी उधळून लावला. यातील संशयित मनोहर आत्माराम सुरडकर याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असून त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे.

- Advertisement -

Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

किरकोळ भांडणावरुन दि. 11 ऑक्टोंबर 2020 रोजी कैफ शेख जाकीर या तरुणाच्या डोक्यात रॉड टाकून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुख्य संशयित धम्मप्रिय मनोहर सुरडकर याला पोलिसांनी अटक केली होती. खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला धम्मप्रिय सुरडकर हा वडीलांसोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, नशिराबाद उड्डाणपुलाखाली सिगरेट पिण्यासाठी थांबलेल्या बापलेकावर तिघांनी गोळीबार करीत हल्ला केला होता. यात धम्मप्रिय हा जागीच ठार झाला होता तर त्याचे वडील मनोहर सुरडकर हे गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 21 सप्टेंबर 2021 रोजी घडली होती. या घटनेमुळे भावाने आपल्या भावाच्या खूनाचा बदला खूनाने घेतल्यामुळे एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय-21) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय-21) दोन्ही रा. पंचशिल नगर, भुसावळ या दोघांना अटक करण्यात आली होती. अटक झाल्यापासून ते कारागृहातच आहेत आपल्या डोळ्यासमोर मुलाचा खून झाल्याने धम्मप्रियचे वडील मनोहर सुरळकर हे सूडाच्या आगीत जळत होते. त्यानुसार त्यांनी सूड उगविण्यासाठी संशयितांना न्यायालयात आणल्यानंतर त्यांना संपविण्याचा प्लॅन तयार केला होता.

बुरखा घालून मंदिराजवळ बसल्याने बळावला संशय

बुरखा घालून दोघ संशयित दबा धरुन न्यायालयाच्या शेजारी असलेल्या मंदिराजवळ बसले होते. दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी याबाबतची माहिती लागलीच शहर पोलीस ठाण्याचे पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, गुन्हे शोध पथकातील तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर यांनी घटनास्थळी धाव घेत मनोहर सुरडकर याला ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार सुरेश इंधाटे हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर आहे.

संशयितांना मारून घेणार होतो मुलाच्या खूनाचा बदला

संशयित मनोहर सुरडकर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे पर्स आढळून आली. त्याामध्ये एक गावठी पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुस आढळून आले. आपण आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली मनोहर सुरडकर दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

न्यायालयात होता दबा धरून

मुलाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी मनोहर सुरडकर हे आपला साथीदार सुरेश राजू इंधाटे याच्यासोबत सोमवारी कालीपीलीने अजिंठा चौकात आले तेथून ते दोघ रिक्षाने न्यायालयात आले. त्यानंतर बुरखा आणि पायात महिलेचे बुट परिधान करुन ते न्यायालयाच्या आवारात दबा धरुन बसले होते. तसेच तारखेसाठी दोघ संशयितांना न्यायालयात आणताच त्यांच्यावर गोळीबार करुन ते आपला बदला घेण्याचा त्यांचा कट त्यांनी रचला होता. परंतु त्यापुर्वीच त्यांना कट पोलिसांनी उधळून लावला.

कट उधळणार्‍या कर्मचार्‍याच्या पाठीवर कौतुकाची थाप

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीखक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात येवून माहिती जावून घेतली. तसेच ही कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांची भेट घेवून त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

वाहतुक पोलिसाच्या सतर्कतेमुळे टळली घटना

न्यायालयाच्या आवारात बुरखा घालून दोन पुरुष बसलेले असल्याने परिसरातील नागरिकांना ते दोघ मुलांना पळविणारे असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी वेशांतरण केलेल्या मनोहर सुरडकर व त्याचा साथीदार सुरेश इंधाटे यांना पकडून ठेवल्याने त्याठिकाणी गोंधळ सुरु होता. ही माहिती कोर्ट चौकात ड्युटीवर असलेले परमेश्वर जाधव यांना मिळाली. त्यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेत संशयत मनोहर सुरडकर याला ताब्यात घेत घटनेची माहिती वायरलेसवर कळविली.

थोड्याच वेळात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर संशयिताची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे लोड केलेले गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस मिळून आले. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून न्यायालयाच्या आवारात बदला घेण्यासाठी आल्याची माहिती समोर आल्यानंतर वाहतुक पोलीस परमेश्वर जाधव यांच्या सतर्कमुळे न्यायालयाच्या आवारात होणारी मोठी घटना टळली.

- Advertisment -

ताज्या बातम्या