Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याKarnataka Election 2023 : कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस पक्षात 'या' दोन नेत्यांमध्ये चुरस

Karnataka Election 2023 : कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस पक्षात ‘या’ दोन नेत्यांमध्ये चुरस

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) मतमोजणीला आज सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर आता कर्नाटकचे निकाल हाती येत असून येथे भाजपला (BJP) मोठा धक्का बसताना दिसत आहे. सध्या याठिकाणी काँग्रेस १२२, भाजप ७१, जेडीएस २५ तर इतर उमेदवार ०६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या (Congress) बाजूने जनतेचा कौल दिसून येत आहे…

- Advertisement -

Karnataka Election 2023 : संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, मोदी-शाहांनी…

तसेच निवडणुकीतील या आघाडीमुळे कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशातच आता कर्नाटकात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी (Chief Ministers) शर्यत सुरू झाली आहे. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसचा पुढील मुख्यमंत्री कोण? हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

कर्नाटकात काँग्रेस बहुमताच्या जवळ येत असल्याने मुख्यमंत्रीपदासाठी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah)आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणत्या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

कर्नाटकात काँग्रेस विजयाकडे आगेकूच करत असताना दुसरीकडे कोणताही घोडेबाजार होऊ नये यासाठी काँग्रेसने आतापासून कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने घोडेबाजार थांबवण्यासाठी निवडून आलेल्या आमदारांना बंगळुरूला बोलावले असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या